+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपरमटंना ३० टक्के बोनस, टेंपररींना दिवाळीला साबणही नाही adjust शाळा, मोबाईल शॉपीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक adjustअण्णा मोगणे संघाने जिंकला आमदार यादव चषक adjustशिवाजी विद्यापीठाच्या टेनिस पुरुष संघाने चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली adjustशहाजी कॉलेजतर्फे आंतरमहाविद्यालयीन निबंध-वक्तृत्व स्पर्धा adjust युवतीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरी adjustशरद पवार गटाचे कोल्हापूर दक्षिणमध्ये घरोघरी राष्ट्रवादी अभियान adjustदक्षिणमध्ये २४ हजार लाभार्थ्यांना स्वखर्चातून आयुष्मान भारत कार्ड देणार- अमल महाडिक adjustज्या क्षेत्रात काम करताय त्यावर मनापासून प्रेम आवश्यक -स्पृहा जोशी adjustभाजपा अल्पसंख्याक मोर्चा जिल्हा सरचिटणीसपदी शाहरुख गडवाले
Screenshot_20231123_202106~2
schedule12 Sep 20 person by visibility 7628 categoryशैक्षणिक

 शोध समिती  अंतिमत: पाच जणांची निवड करणार, त्या पाचही जणांची नावे कुलपती कार्यालयाला कळवणार,कुलगुरुपदासाठी त्या पाच जणांच्या स्वतंत्र मुलाखती होणार

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या निवड प्रक्रियेतंर्गत मुलाखतीसाठी २५ उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. शोध समितीने कुलगुरुपदासाठीच्या अर्जाची छाननी केली. छाननी अंती २५ जण मुलाखतीसाठी पात्र ठरली आहेत. त्यांच्या मुलाखती २६ आणि २७ सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहेत. शोध समिती यामधून अंतिमत: पाच जणांची नावे निश्चित करुन कुलपती कार्यालयाला सादर करेल. कुलपती तथा राज्यपाल यांच्यापुढे त्या पाच जणांचे सादरीकरण होईल. कुलपतींच्यापुढे त्यांच्या स्वतंत्र मुलाखती होतील. त्यानंतर कुलपती,एकाची कुलगुरुपदी निवड करतील.

सध्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. तत्कालिन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या कुलगुरुपदाचा कार्यकाल १७ जून रोजी संपला आहे.कुलपती कार्यालयाने कुलगुरू निवड प्रक्रियेतर्गत इच्छुकांकडून दोन जुलैपर्यंत अर्ज मागिवले होते. तर हार्ड कॉपी पाठविण्याची मुदत दहा जुलैपर्यंत होती. कुलपती कार्यालयाने विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरुंनी पहिल्या टप्प्यात त्रिसदस्यीय शोध समिती नेमली आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव अशा विविध शहरातील शिक्षण संस्था, नामांकित विद्यापीठातील प्रोफेसरांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील प्राध्यापकांनीही कुलगुरुपदासाठी अर्ज केले आहेत. तब्बल १६० हून अधिक अर्ज कुलपती कार्यालयाकडे जमा झाले होते. समितीकडून त्या अर्जांची छाननी करुन पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी २५ जणांची यादी निश्चित केली आहे.

…………….

मुलाखतीस पात्र २५ जणांच्या यादीतील नावे..

त्रिसदस्यीय शोध समितीने त्या अर्जांची छाननी करुन निवड प्रक्रियेंतर्गत २५ जणांची नावे मुलाखतीसाठी निश्चित केली आहेत. मुलाखतीस पात्र यादीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आणि सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. आर. व्ही.शेजवळ, सांगलीतील भारती् विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डी.जी. कणसे, शिवाजी विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागातील डॉ. व्ही. जे. फुलारी यांच्या नावाचा समावेश आहे. तसेच पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.संजीव सोनवणे, मानव्यविद्या शाखेच्या अधिष्ठाता डॉ.अंजली दिनकर कुरणे आणि रसायनशास्त्र विभागातील प्रो.डॉ. अविनाश कुंभार यांच्या नावाचा समावेश आहे. जळगाव विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पी.पी. माहुलीकर यांचे नावही मुलाखतीच्या २५ जणांच्या यादीत असल्याचे वृत्त आहे. माहुलीकर हे मूळचे  विटा-माहुली येथील आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठात एमएस्सी पीएचडी केली आहे.

………………………….

कुलसचिवासह विद्यापीठातील अनेक जण कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाहेर

शिवाजी विद्यापीठातील विविध विभागाचे प्रमुख, प्रोफेसर आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले होते. यामध्ये कुलसचिव विलास नांदवडेकर, नॅनो टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले, माजी विभागप्रमुख डॉ. विजय ककडे, डॉ. पी. एस. कांबळे, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. जगन कराडे, कॉमर्स विभागाचे डॉ. अण्णासाहेब गुरव, रसायनशास्त्र विभागातील डॉ. एस. एस. चव्हाण, पर्यावरणशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत, बायोकेमिस्ट्री डॉ. ज्योती जाधव, यांनी कुलगुरुपदासाठी अर्ज केले होते. संशोधन व अन्य पातळीवर काम होते. दरम्यान शनिवारी कुलपती कार्यालयाकडून कुलगुरुपदाच्या मुलाखतीसाठी २५ जणांची यादी जाहीर झाली.त्यामध्ये या मंडळीच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे ही मंडळी कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची चर्चा विद्यापीठ व शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

……………………………………