+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार adjustमेगा पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये फार्मसीच्या ४८ विद्यार्थ्यांना नोकरी adjustकेआयटीत अँप्लिकेशन ऑफ फेरोसिमेंट इन सिव्हील इंजिनीरिंगसंबंधी कार्यशाळा adjustमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी कोल्हापुरात दुचाकी रॅली
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Jan 24 person by visibility 229 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : 
गडहिंग्लज तालुक्यातील बिद्रेवाडी येथे झालेल्या खूनाच्या गुन्ह्यातील एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सचिन भिमराव नाईक असे संशयिताचे नाव असून तो गेल्या आठवडाभरापासून फरार होता.
बिद्रेवाडी येथे उत्तम नाईक आणि सचिन नाईक हे दोघे एकमेकांच्या शेजारी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत राहत होते. रविवारी सात जानेवारी रोजी आपल्या पत्नीकडे पाहत असल्याच्या रागातूनसंशयित सचिन नाईकने उत्तम भरमु नाईक याच्या डोक्यात लाकडी ओंडका घालून गंभीर जखमी केलं होते. याप्रकरणी नेसरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील जखमी उत्तम नाईक याचा उपचारादरम्यान रविवारी १४ जानेवारी रोजी एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी सचिन नाईक यांच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील संशयित सचिन नाईक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. दरम्यान, सचिन नाईक हा गुरुवारी निपाणी इथून लिंगनूर कडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सचिन नाईक याला ताब्यात घेतले .
पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव,शेष मोरे, अंमलदार अमोल कोळी, महेश गवळी, अमित सर्जे, नवनाथ कदम, शिवानंद मठपती, अमोल कोळेकर, तुकाराम राजगिरे, सुशील पाटील, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर, समीर कांबळे, अजय गोडबोले यांचा कारवाईत सहभाग होता.