+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustआंबा महोत्सवाला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद adjustशिवाजी विद्यापीठात शुक्रवारपासून तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन ! ३०० कलाकार होणार सहभागी adjust टेनिस स्पर्धेत नऊ मानांकित खेळाडूंचे आव्हान संपुष्टात adjustकोल्हापुरात रविवारी गुरुवंदना महोत्सव adjustगावात नो डॉल्बी, नो डिजीटल फलक ! शांतता-सामाजिक सलोख्याचा माणगाव पॅटर्न !! adjustन्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९९.४९ टक्के adjustकोल्हापुरातील १९० शाळांना मोफत पाठयपुस्तक वाटपास प्रारंभ adjustजिल्हातंर्गत बदली प्रक्रिया सुरू करावी, पुरोगामीचे ग्रामविकासला निवेदन adjustनिधी खर्चावर सीईओंचे लक्ष, अधिकाऱ्यांना सक्त सूचना ! adjustगोखले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत यश
1000309877
Screenshot_20240226_195247~2
schedule12 Apr 24 person by visibility 458 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
हातकणंगले लोकसभेसाठी इचलकरंजीचे आमदार आवाडे यांनी स्वतःच्या ताराराणी पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आमदार आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. आमदार आवाडे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची कोंडी झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा पंचरंगी लढतीचे चिन्ह आहेत. आवाडे हे गेली पाच वर्षे भाजपचे सहयोगी सदस्य म्हणून सक्रिय होते.
 आवाडे यांच्या भूमिकेमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात रंगत वाढली आहे. जैन समाजाचे तीन उमेदवार झाले. महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनाकडून माजी खासदार राजू शेट्टी तर वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष  डी सी पाटील उमेदवार आहेत.
 इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी विद्यमान खासदार धैर्यशील  माने यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतले होते. लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आवाडे व त्यांचे चिरंजीव राहुल आवाडे या दोघांच्याही नावाची चर्चा होती. मात्र महायुतीने विद्यमान खासदार माने यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आवाडे हे नाराज होते.
उमेदवारी घोषित करण्यापूर्वी आवाडे यांनी अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जनसुराज्य शक पक्षाचे नेतेविन य कोरे यांची भेट घेऊन बंद खोलीत  चर्चा केली असल्याचे वृत्त आहे.