Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कंगना राणावतांच्या विरोधात कोल्हापुरात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, हाती घेतले चप्पलगोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेशसत्यशोधक इतिहास परिषदेतर्फे रविवारी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनसाहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात यावे : डॉ. सुनीलकुमार लवटे विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेतर्फे दिवंगत सभासदाच्या वारसांना अर्थसहाय्य थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेची कडक पावले !  मिळकतधारकांवर सक्त कारवाई, कर्मचाऱ्यांचे पगार थांबणार !!हवाई दलातील निवृत्त अधिकाऱ्याची शिवाजी विद्यापीठातून पीएचडीठठ ददरंगकर्मींचे भर पावसात आंदोलन, खाजगीकरणाच्या विरोधात बरसल्या घोषणाउद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेतर्फे वृक्षारोपण

जाहिरात

 

गोकुळचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करा : सर्किट बेंचचा आदेश

schedule29 Jul 26 person by visibility 63 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याच्या देशात सर्किट बेंच ने दिले आहेत. 29 जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सर्किट बँकेने निवडणुका लवकर घ्याव्यात असे म्हटले आहे. यावेळी त्यांनी 90 दिवसात घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते हे निदर्शनास आणले. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची मुदत 3 ऑगस्ट 2026 रोजी संपत असून देखील अद्याप कच्ची मतदार यादी प्रसिद्ध केली नाही. सरकार जाणीवपूर्वक गोकुळ दूध संघाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात होते त्यामुळे पुंगाव तालुका राधानगरी येथील स्वामी समर्थ सहकारी दूध व्यवसायिक संस्था यांनी सर्किट बेंच कोल्हापूर येथे याचिका दाखल केली होती.  याचिकेची सुनावणी 29 जुलै 2026 रोजी झाली असून त्या कामी न्यायमूर्ती मिलिंद जाधव व न्यायमूर्ती नंदेश देशपांडे यांचे खंडपीठाने सदर याचिकेची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाचे गोकुळ दूध संघाची निवडणूक 90 दिवसात घेण्याचे आदेश असताना देखील शासनाने कच्ची मतदार यादी देखील अद्याप प्रसिद्ध न केल्याने नाराजी व्यक्त केली व शासनास व दुग्ध विभागास गोकुळ दूध संघाची निवडणूक तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. सदर निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू न केल्यास सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल संबंधितांवर कायद्यातील तरतुदी अन्वये योग्य ती कारवाई केली जाईल असे आदेश दिले. संस्थेचे वतीने ज्येष्ठविधीज्ञ श्रीनिवास पटवर्धन व  भूषण मंडलिक यांनी बाजू मांडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes