दीपा अजित ठाणेकर महापालिका निवडणूक लढवणार
schedule26 Dec 25 person by visibility 58 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात मधून माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर या निवडणूक लढविणार आहेत. त्या महिला प्रवर्गातून या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दाखविला असल्याचे वृत्त आहे.
प्रभाग क्रमांक सात येथे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर व भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर हे दोघे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक घेण्यासाठी तयारी करत आहेत. ऋतुराज क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित आहे. सर्वसाधारण गटातून ऋतुराज क्षीरसागर यांची उमेदवारी ठरल्याने अजित ठाणेकर यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी दीपा ठाणेकर यांनी महिला प्रवर्गातून निवडणूक लढवावी असा विचार पुढे आला. भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार क्षीरसागर यांनीही या संदर्भात ठाणेकर यांच्याशी चर्चा केली. नेत्यांच्या सोबत झालेल्या चर्चेंनुसार प्रभाग क्रमांक सातमधून दीपा ठाणेकर यांची महिला प्रवर्गातून उमेदवारी निश्चित मानले जात आहे. त्यांनीही भागांमध्ये संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अजित ठाणेकर हे भारतीय जनता पक्षाचे अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. महापालिका सभागृहात त्यांनी शहरवासीयांशी निगडित विविध प्रश्नांना वाचा फोडली गेली. पाच वर्षे ते महापालिका निवडणूक लढवायची म्हणून तयारी करत होते. दरम्यान एकाच मतदारसंघात दोन सर्वसाधारण उमेदवार देण्याचा विषय उपस्थित झाला. यामधून मार्ग काढताना अजित ठाणेकर यांनी निवडणुकीतून माघार घ्यायची असा प्रस्ताव पुण्याला आणि त्यांच्या ऐवजी महिला प्रवर्गातून दीपा यांना उमेदवारी द्यायचे ठरले. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये या संदर्भात अधिकृत घोषणा माहितीच्या माध्यमातून होणार आहे