स्वच्छ - हरित कोल्हापूर, भ्रष्टाचारमुक्त महापालिका : शिवसेना ठाकरे पक्षाचा वचननामा
schedule08 Jan 26 person by visibility 54 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवारी आठ जानेवारी रोजी वचननामा जाहीर करण्यात आला. "स्वच्छ आणि हरित कोल्हापूर, भ्रष्टाचारमुक्त महापालिका यावर शिवसेनेने फोकस ठेवला आहे. तसेच कोल्हापूरकरांना पायाभूत सुविधांची उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्यक्रम राहील. "असे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहर प्रमुख सुनील मोदी, विशाल देवकुळे, मनजित माने, माजी नगरसेविका व उमेदवार प्रतिज्ञा उत्तुरे, राजेंद्र जाधव, सुप्रिया सागर साळोखे यांच्या उपस्थितीमध्ये हा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. सहसंपर्क प्रमुख देवणे, जिल्हाप्रमुख इंगवले व शहर प्रमुख मोदी यांनी वचननामामधील ठळक बाबी सांगितल्या. शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण, ड्रेनेज व पावसाळी पाणी निचरा व्यवस्थेचे आधुनिकीकरण, कोल्हापूरसाठी स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्था 24 तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, प्रत्येक प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी, शाळांचे डिजिटलिकरण व गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व करिअर मार्गदर्शन केंद्र, महिलासाठी सुरक्षित शहर अभियान, महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सुविधा, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, पंचगंगा नदी व रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे, करवसुली सुटसुटीत योजना, महापालिकेच्या उत्पन्नात वाढ आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासंबंधी निश्चित योजना या बाबींचा वचननाम्यामध्ये समावेश आहे.
देवणे म्हणाले, "कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस व शिवसेना ठाकरे पक्षाची सत्ता येईल याचा आम्हाला विश्वास आहे. महायुतीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे." जिल्हाप्रमुख इंगवले यांनी शिवसेनेचा वचननामा हा नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयार केला आहे असे सांगितले. भाजपवर टीका करताना इंगवले म्हणाले " सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो हे त्यांनी एमआयएम सोबत केलेल्या युतीवरून दिसून येते. आपलं ते बाळ आणि दुसऱ्याच ते कार्ट अशी भाजपची निती आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगले यश मिळेल." पत्रकार परिषदेला महेश उत्तुरे, संदीप पाटील, राहुल माळी आदी उपस्थित होते.