कोरे अभियांत्रिकीच्या पीबीएल प्रदर्शनात २३०० विद्यार्थ्यांचे ३५० प्रकल्पांचे सादरीकरण
schedule12 Nov 26 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये एस.वाय. व टी.वाय. बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पाधारित शिक्षण (पीबीएल) दिनाचा सोहळा उत्साहात झाला. प्रकल्प प्रदर्शनात सर्व अभियांत्रिकी शाखांतील सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी ३५० हून अधिक प्रकल्प गटांद्वारे नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. यावेळी किर्लोस्कर ऑईल इंजिन्स, कोल्हापूरचे माजी वरिष्ठ महाव्यवस्थापक नितीन भावे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांच्या हस्ते झाले. यावेळी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, पीबीएल समन्वयक प्रा. एस. व्ही. निकम तसेच सुधीर पाटील, शिवकुमार सासणे उपस्थित होते. यावेळी वारणा पीबीएल पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचा नितीन भावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी विद्यार्थ्यांनी उद्योगजगताच्या गरजांनुसार कौशल्ये विकसित करून संशोधन व नवोपक्रमाकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी प्रा. एम. व्ही.जाधव, प्रा. आर. आर चव्हाण, प्रा.एन. एम. शिंदे, प्रा. ए ए पारेख, प्रा.ओ आर. जंगम, प्रा. एस के जंत्रे, प्रा.एन. सी. देसाई, प्रा.आर. ए. पाटील, प्रा. एल बी आडूरकर यांनी परिश्रम घेतले.