Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभाडीवाय पाटील अभियांत्रिकीला  क्यूएस आय- गेज गोल्ड मानांकनसिद्धगिरीच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा गुरुवारी लोकार्पण सोहळा,  पंकज मुंडेंची उपस्थितीअन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर जोरदार निदर्शनेगुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटीलभटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्स

जाहिरात

 

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभा

schedule31 Aug 26 person by visibility 14 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषद कोल्हापूर येथील स्व. वसंतराव नाईक समिती सभागृहात महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती मा. सौ. विद्या विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी एक महत्त्वपूर्ण व अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, सर्व जिल्हा परिषद सदस्य आपापल्या मतदारसंघातील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

सभेच्या सुरुवातीला शासन निर्णय दि. २७/०८/२०२६ नुसार 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विभागीय पुरस्कार' पात्र ठरलेल्या 'स्वयंप्रेरिका ग्रामीण महिला संस्था' (पोर्ले तर्फे बोरगाव) आणि 'भगवानबाबा शिक्षण प्रसारक संस्था' (इचलकरंजी) या संस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

सभापती सौ. विद्या पाटील यांनी अंगणवाड्यांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. ज्या अंगणवाड्यांमध्ये सोलर पॅनेल नादुरुस्त आहेत, तेथे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तात्काळ वीज जोडणी (लाइट कनेक्शन) करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, बालकांच्या आरोग्याच्या अचूक नोंदीसाठी नादुरुस्त वजनकाटे बदलून नवीन काटे देणे आणि बंद असलेले डिजिटल लर्निंग टीव्ही बदलून नवीन टीव्ही उपलब्ध करून दयावेत. यासोबतच, करवीर पंचायत समिती येथे महिलांसाठी नवीन समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीदरम्यान सदस्या श्रीमती वर्षाराणी पाटील यांनी उपस्थितांना 'नशामुक्तीची शपथ' दिली. सभेचे आभार सदस्या श्रीमती सोनाली पाटील यांनी मानले.

या बैठकीस समिती सदस्या वर्षाराणी पाटील, शैलजा पाटील, रोहिणी आबिटकर, संयोगिता मोरे, सोनाली पाटील, विनिता भोगम, गडहिंग्लज पंचायत समिती सभापती प्रतिभा चव्हाण, तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के, कक्ष अधिकारी संजय जाधव, अधीक्षक नारायण चांदेकर, विस्तार अधिकारी प्रशांत पाटील, सौरभ कांबळे  उपस्थित होते.

पत्रकार परिषदेसमोरील मुख्य विषय मांडले*

schedule15 Aug 23 person by visibility 580 category

*पत्रकार परिषदेसमोरील मुख्य विषय मांडले* 

१ ) धनगर ST आरक्षण
२ ) मेंढपाळ बांधवांवर हल्ले
३ ) अहमदनगर जिल्हाचे पु. अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करणे.
४ ) एक हजार कोटी रुपयांची घोषित योजना लागू करणे.
५ ) गायरान जमिनी शेळ्या मेंढ्यासाठी आरक्षित करणे. 
६ ) सध्या होत असलेल्या भरती प्रक्रिया मध्ये योग्य आरक्षणनुसार भरती करणे.
७ ) शेळ्या मेंढ्याचे लसीकरण पूर्वीप्रमाणे प्रती शेळी मेंढी एक रुपया प्रमाणे करणे. इ.
८ ) महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान किल्ले वाफगाव राज्य संरक्षित स्मारक व्हावे.
९ ) स्पर्धा परीक्षा वेळोवेळी घ्याव्यात व त्यांची फी योग्य असावी.

महावीर इंग्लिश स्कूलचा निकाल शंभर टक्के

schedule30 Jul 20 person by visibility 1069 categoryलाइफस्टाइल


महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महावीर एज्युकेशन सोसायटी संचलित महावीर इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. गेली सोळा वर्षे या स्कूलचा निकाल १०० टक्के लागत आहे. यशाची ही परंपरा यंदाही कायम राहिली. महावीर इंग्लिश स्कूलच्य श्रृती शेळके, रुचिता पोतदार,किमया गुर्जर, आदिती कुंभार, ओजस होनाळे, श्रृती देवाडकर आदी विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. संस्थेचे अध्यक्ष ललित गांधी, मानद सचिव महेश सामंत, प्रिन्सिपल धनश्री व्हनागडे, दीपा म्हाळुंगेकर,विद्या सरमळकर, मेहजबीन बागवान,पल्लवी पाटील व अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

………………………


जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes