Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणगगन जजभटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सवाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबा

जाहिरात

 

गुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरण

schedule31 Aug 26 person by visibility 23 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गुजरीचा गोविंदा या नावाने प्रसिद्ध असलेल्या न्यू गुजरी मित्र मंडळाच्या यंदाच्या दहीहंडी उत्सवांमध्ये रशियन कलाकारांचे सादरीकरण हे प्रमुख आकर्षण असणार आहे. न्यू गुजरी मित्र मंडळाचे यंदा दहीहंडी उत्सवाचे चाळीसावे वर्ष आहे अशी माहिती नगरसेवक किरण नकाते यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
 ‘गुजरीचा गोविंदा’ दहीहंडी उत्सवाचे यंदाचे आयोजन अधिक स्वरूपात करण्यात आले आहे. लाख रुपयांचे  पारितोषिक, थरारक गोविंदा पथकांचा सहभाग, नामवंत कलाकारांची उपस्थिती, नृत्य, ढोल-ताशांचा गजर, आतषबाजी आणि अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश योजना त्यामुळे उत्सव आकर्षण ठरेल.यंदाच्या उत्सवात बॉस मराठी फेम रशियन अभिनेत्री  इरिना यांचे विशेष सादरीकरण होणार आहे . त्याचबरोबर डान्स महाराष्ट्र डान्स, सुपर डान्सर-५, वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप क्वालिफायर यांसारख्या कार्यक्रमांमधून आपल्या नृत्यकलेची छाप पाडणाऱ्या आदिती जाधव यांच्यासह इतर नामवंत सेलिब्रेटींची उपस्थिती आणि नृत्याचे कार्यक्रम सादर होणार आहेत.
उत्सवामध्ये ‘करवीर गर्जना ढोल पथका’चे विशेष कला सादरीकरण होणार आहे. दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षिततेचा विचार यंदा विशेषत्वाने करण्यात आला आहे. शेवटच्या थरावर चढणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षेसाठी विशेष बेल्टची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

यंदाच्या ‘गुजरीचा गोविंदा’ उत्सवाच्या आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी उत्सवाची उत्कृष्ट रील तयार करणाऱ्या फोटोग्राफर, व्यक्ती अथवा कलाकाराला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, सुहास लटोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सायंकाळी पाच वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची विशेष उपस्थिती असणार आहे. पत्रकार परिषदेवेळी सत्यजित सांगावकर, जितेश पटेल,  अमर नकाते,  नियाज नणंदीकर, निखिल खटके संतोष खोबरे, हुसेन सय्यद, अनिल यादव आदी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes