Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गुजरीचा गोविंदा दहीहंडी उत्सवात यंदा रशियन कलाकाराचे सादरीकरणशिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटीलभटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सवाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबा

जाहिरात

 

शिष्यवृत्तीची रक्कम वाढवणार, वारणेत जागतिक कीर्तीचे तज्ञ आणणार - डॉ. एन. एच. पाटील

schedule31 Aug 26 person by visibility 28 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  वारणा विद्यापीठ आणि तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीमधील विद्यार्थ्यांसाठी जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ वारणेत आणले जातील. तसेच यावर्षीपासून 'शोभाताई कोरे ज्ञान शिष्यवृत्ती'ची रक्कम व लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती वारणा विद्यापीठाचे प्रॉव्होस्ट  एन. एच. पाटील यांनी दिली.

तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमस), वारणानगर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अभियांत्रिकी, एमबीए व एमसीएच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षारंभ’ विद्यार्थी ओरिएंटेशन व इंडक्शन प्रोग्रामच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  उद्घाटन प्रसंगी १६०० हून अधिक विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भ शुभेच्छा दिल्या.वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार वर्षांत काय शिकायचे व पदवीनंतर काय साध्य करायचे याचे नियोजन करून तात्यासाहेब कोरे यांच्या स्वप्नातील सक्षम व जबाबदार व्यक्ती बनावे, असे आवाहन केले.

वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी यांनी महाविद्यालयातील परीक्षा पद्धती, इलेक्ट्रिकल वेहिकल लॅब (इव्ही), प्रशिक्षण कार्यक्रम तसेच नव्याने सुरू होणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे,कुलसचिव, विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी, मा. (डॉ.) प्रसाद बी. रामपुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. घाडगे पाटील इंडस्ट्रीज मधील असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट  फत्तेसिंग जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक व आरोग्यविषयक विकासाचे महत्त्व विविध उदाहरणांसह स्पष्ट केले.

प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉ. पी. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची  माहिती दिली. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे, डॉ. पी. व्ही. मुळीक, डीन अकॅडेमिक्स,  एमबीए विभागप्रमुख प्रा. पी. एस. कडापूरे, एमसीए विभागप्रमुख डॉ. शिवलीला अरळिमट्टी, ऍडमिशन इन्चार्ज, डॉ. ए व्ही पाटील, प्रा . डी. एस. माने उपस्थित होते. . डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे व प्रा. मिलिंद कामत यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. एस. एम. जाधव व डॉ. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes