Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
भटके‑विमुक्तांचा इतिहास हा जिद्दीचा...संघर्षाचा अन् स्वाभिमानाचा !ऑलम्पिंकवीर खाशाबांचे चरित्र सर्वांना नेहमीच प्रेरणादायी - पै . विष्णू जोशीलकरसुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलनडी वाय पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सवाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, रोबोटिक्स प्रशिक्षणकलनाकवाडीत शेतकऱ्यांना सीएसआर फंडातून फवारणी पंपांचे वाटपशिवाजी विद्यापीठात बुधवारी वि.स. खांडेकर सुवर्ण स्मृतिवर्ष सांगता समारंभजुनी पेन्शनसाठीच्या मूक मोर्चाला शैक्षणिक व्यासपीठ, मुध्याध्यापक संघाचा पाठिंबादप्तर झाले हलके... आनंदित झाली बालके !होस्टेलमध्ये रक्षाबंधन, विद्यार्थिनींनी बांधली कृष्णराज महाडिकांना राखी

जाहिरात

 

सुटा अंतर्गत धुसफूस, संघर्ष समितीचे कार्यालयासमोर  धरणे आंदोलन

schedule31 Aug 26 person by visibility 42 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिनीअर कॉलेजमधील प्राध्यापकांची मुख्य संघटना अशी ओळख असलेल्या शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघटनेतील (सुटा) धुसफूस पुन्हा चव्हाटयावर आली. सुटा संघर्ष समितीने, ‘संघटनेच्या घटनेतील बेकायदेशीर बदल रद्द करावा, सहायक कामगार आयुक्तांनी दिलेली मान्यता रद्द करावी’ या मागणीसाठी सुटा कार्यालयासमोर रविवारी ३० ऑगस्ट २०२६ रोजी धरणे आंदोलन केले. लोकशाही पद्धतीने सुटाचा कारभार चालावा अशी अपेक्षाही संघर्ष समितीने व्यक्त केली. संघर्ष समितीतील प्रा. एस. जी. पाटील, डॉ. टी.व्ही. स्वामी, अरुण पाटील, गुंडोपंत पाटील, युवराज पाटील, तानाजी पाटील यांनी दुपारी तीन ते पाच या वेळेत धरणे आंदोलन केले. सुटा कोल्हापूरच्या कार्यकारिणीची मुदत २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संपली आहे. मात्र कार्यकारिणीने निवडणुका न घेता दीड वर्षे बेकायदेशीररित्या कारभार केला आहे. शिवाय जनरल कौन्सुल, आमसभेची मान्यता न घेता सुटाच्या घटनेमध्ये बदल केला. शिवाय सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून मान्य करुन घेतला. आयुक्तांनी ही मान्यता रद्द करावी अशी मागणी संघर्ष समितीने केला आहे. दरम्यान ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ आर. के. चव्हाण यांनी, ‘संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाशी संघटनेचा कोणताही संबंध नाही. संघर्ष समितीचे आंदोलन हे बेकायदेशीर आहे. मुळात या आंदोलनाला संघटनेची परवानगी नाही. शिवाय त्यांनीही आंदोलनाला परवानगी घेतल्याचे पोलिसांचे पत्रही संघटनेला सादर केले नाही. संघटनेतील काही असंतुष्ट लोकांचे हे आंदोलन आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes