महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दीपावली सणानिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर २०२४ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिषद बंद असणार आहे. दीपावलीनिमित्त गुरुवारपासून सुट्टया जाहीर झाल्या आहेत. सुट्टया जाहीर झाल्यामुळे मिनी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. सध्या निवडणुकीनिमित अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यावर ठिकठिकाणी निवडणूक विषयक कामासाठी नियुक्त्या केल्या आहेत. चार नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू राहील.