महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंंघातील महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
महायुतीकडून शिवसेनेतर्फे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर झालीआहे. क्षीरसागर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. क्षीरसागर यांनी बुधवारी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी भाजपा पदाधिकाऱ्यांनी, क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, माजी उपमहापौर विलास वास्कर, विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके, किरण नकाते, महिला आघाडीच्या रुपाराणी निकम, गायत्री राऊत आदी उपस्थित होते.