महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी विभागातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बदल्यांचे आदेश होऊन संबंधित अधिकारी नवीन ठिकाणी रुजू झाले आहेत. कृषी विकास अधिकारी अभयकुमार यशवंतराव चव्हाण यांनी सांगली येथे आत्मा प्रकल्प संचालकपदी पदोन्नती झाली. त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या कृषी विकास अधिकारीपदाचा तात्पुरता कार्यभार सारिका वसगावकर-रेपे यांच्याकडे सोपविला आहे. चव्हाण हे दोन जून २०२३ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेत कृषी विकास अधिकारी म्हणून रुजू झाले होते. दीड वर्षाच्या आत त्यांची पदोन्नतीने बदली झाली. काही महिन्यापूर्वी वरिष्ठांना कल्पना न देता ऑफिस वेळेत कार्यालयाबाहेर जाणे, वेळेवर न येणे या कारणास्तव त्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस काढली होती. दरम्यान कृषी विभागातील मोहिम अधिकारी टी के. पाटील यांची रामेथी कोल्हापूर येथे बदली झाली तर कृषी अधिकारी गौरी मठपती यांची बदली कागल पंचायत समिती येथ झाली आहे.