महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातील रस्त्यांच्या दुरवस्थेकडे बोट ठेवताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हीलचेअरवर बसलेले, वॉकर घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत राऊत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरातील रस्त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे राऊत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत माजी नगरसेवक राजू दिंडोर्ल, प्रसाद पाटील, राजू जाधव, विजय करजगार, अजिंक्य शिंदे आदी उपस्थित होते.