जिल्हा परिषद प्रज्ञाशोध परीक्षा अंतिम निकाल जाहीर !कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, शिरोळचे वर्चस्व !!
schedule19 Apr 23 person by visibility 1946 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता चौथीमध्ये शिरोळचा पृथ्वीराज सूर्यवंशी १९२ गुण तर ७ वीमध्ये कागलची अनुष्का पाटील १८८ गुण मिळवून प्रथम आले. निकालात कागल, राधानगरी, भुदरगड, करवीर, शिरोळचे वर्चस्व आहे.
प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जि.प.स्वनिधीमधून जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इयत्ता ४ थी व ७ वी मधील सर्व विद्यार्थ्याची २०० गुणांची प्रज्ञाशोध परीक्षा मराठी व उर्दू माध्यमातून आयोजित केली होती. यासाठी ४४५५९ विद्यार्थ्यांची ३४३ केंद्रावर २७ मार्च २०२३ रोजी चाळणी परीक्षा झाली. तसेच ३८०० विदयाथ्यांची निवड परीक्षा दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी परीक्षा झाली. या परीक्षेमधून इयत्ता ४ थी व ७ वी तील जिल्हास्तरावर गुणानुक्रमे १० विद्यर्थ्यांची निवड केली जाते. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या विद्यर्थ्यांना प्रथम ५,००० रुपये, व्दितीय ४,००० रुपये, तृतीय ३०००व उत्तेजनार्थ सात विद्यार्थ्यांना प्रत्येकी २,००० रुपये इतकी बक्षीस म्हणून रक्कम दिली जाते. तालुकास्तर प्रथम तीन विदयार्थ्यांना प्रत्येकी १,५००/-,१,०००/-,५०० रुपये बक्षीस म्हणून रक्कम व उर्वरित मुलांना प्रमाणपत्र दिले जाते. शिवाय सर्व बक्षिसपात्र विदयार्थ्यांना प्रमाणपत्र व चषक दिला जातो.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद दरवर्षी इयत्ता ५ वी व ८ वी साठी विदयार्थ्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करत असते. या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी कोल्हापूर शिक्षण विभागामार्फत प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमुळे विद्यार्थी मोठ्या धैर्याने शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जातात आणि राज्यातील प्रथम क्रमांक टिकविण्यात मदत होते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाणांनी जि.प.स्वनिधी मधून विशेष आर्थिक तरतूद केली होती. तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारीी अशा उबाळेे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी माध्यमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी डी.सी. कुंभार वि व उर्दू माध्यमासाठी श शिक्षण विस्तार अधिकारी एम.आय. सुतार यांनी काम पाहिले. परीक्षा यशस्वी होणेसाठी उपशिक्षणाधिकारी श्रीमती जयश्री जाधव, विस्तार अधिकारी आर. डी पाटील, आर वाय ठोकळ व वरीष्ठ लिपिक गौरव पोवार यांनी काम पाहिले . परीक्षेत यशस्वी झालेल्या पहिल्या दहा विद्यार्थ्यांची नावे -अनुक्रमे नाव,गाव, तालुका इयत्ता चौथी
पृथ्वीराज सूर्यवंशी (तेरवाड, शिरोळ) , नेहा चौगुले (म्हाकवे, कागल ), राजनील कुदळे( सरवडे, राधानगरी), वेदिका येवारे (माणगाव, हातकणंगले ), तनिष्क चव्हाण (नृसिंहवाडी,शिरोळ), सिद्धेश आंबेकर( कसबा तारळे, राधानगरी ), सृष्टी पताडे (वाळवे, राधानगरी ), स्वरा नाईक (शिनोळी, चंदगड ), विराज भारती (सोनाळी,भुदरगड ), कौमुदी मतीवाडकर (दारवाड भुदरगड).
..........,.
इयत्ता सातवी - अनुष्का पाटील (म्हाकवे, कागल), रोहित पाटील (सुरूपली, कागल), सायली देवडकर (म्हाकवे, कागल ), आदर्श शेटके (म्हाकवे, कागल ),
अथर्व गायकवाड (मोहडे चाफोडी, राधानगरी), आशिष पाटील (म्हाकवे,कागल ), सानवी पाटील (पनोरे ,पन्हाळा), श्रेया पाटील (सावे ,शाहूवाडी), राजवर्धन पाटील (बेळवले बुद्रुक, कागल), प्रतीक्षा घेवदे (बानगे, कागल)