राहुल रोकडेंची सांगलीला बदली, रविकांत आडसूळ नवे अतिरिक्त आयुक्त
schedule16 Jul 25 person by visibility 442 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी रविकांत आडसूळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांची सांगली महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नगरविकास विभागाने यासंबंधीचा आदेश काढला आहे. दरम्यान आडसूळ यांची कोल्हापूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली आहे. या पदावर कोल्हापूर महानगरपालिकेकडील अधिकारी पदोन्नतीने उपलब्ध होईपर्यंत अथवा एक वर्ष यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंतच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुकती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. आडसूळ हे सध्या सांगली महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होते. त्यांच्या जागेवर राहुल रोकडे यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने बदलीचा आदेश निघाला आहे. अतिरिक्त आयुक्त म्हणून दोघांनी आपआपल्या ठिकाणी सव्वा वर्षे काम केले.