केआयटीच्या माध्यमातून वर्षभरात ६०० विद्यार्थ्यांना नोकरीची संधी
schedule17 Jul 25 person by visibility 249 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २४-२५ मध्ये सर्व विभागात मिळून एकूण किमान ६०० विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार थेट राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी दिली आहे. झेन्सर, एचएसबीसी,क्लाऊड ४ सी, टाटा पॉवर,कॉग्निजंट, टीई कनेक्टिव्हिटी, ॲटलास कॉप्को जीसिया , व्हर्टिव्ह इंजीनियरिंग अशा दर्जेदार १२१ कंपन्यांनी केआयटीच्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंती दिली आहे. काही विभागात तर अपेक्षित सर्व विद्यार्थी प्लेस्ड झाले असतानाही अजून काही कंपन्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी उत्सुक आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अत्यंत प्रभावीपणे महाविद्यालयांमध्ये लागू करण्यात आलेले असून विद्यार्थ्यांना अन्य विविध विभागातील विषय शिकण्याची व्यवस्था,रचना केआयटीमध्ये करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना मेजर व मायनर डिग्री केआयटी मध्येच मिळण्यास सुरवात झाली आहे. डॉ. वनरोट्टी म्हणाले, ‘बारा कोटी रुपयांचा निधी केआयटीला ए.आय.सी.टी.ई. व डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीकडून संशोधन तसेच इनोव्हेशनसाठी उपलब्ध झाला आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी,१५ टक्के विद्यार्थ्यांना स्वत:च्या उद्योजकतेसाठी,तर राहिलेल्या १५ टक्के विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी द्वितीय वर्षापासूनच विदयार्थ्यांना प्रोत्साहित व प्रशिक्षित केले जाते.
संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना लागणारे अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याबाबत आम्ही आग्रही व तत्पर आहोत. संस्थांमधील शिक्षकांच्या रिसर्च व इनोव्हेशन विषयक दृष्टिकोनाचा मोठा उपयोग विद्यार्थ्यांना होत आहे. ज्या पद्धतीने प्लेसमेंटसाठी केआयटी आग्रही आहे. संस्थेतर्फे वर्तमानात व भविष्यात उद्योजकतेसाठी प्रयत्नशील राहणार आहे. व्यावसायिक उद्योग क्षेत्राचा अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ७ व्या शैक्षणिक सत्रात इंटर्नशीपच्या माध्यमातून किमान २५० उद्योगांमध्ये थेट काम करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.’
……………………
“ विद्यार्थ्यांच्या जीवनात दर्जात्मक बदल व त्यांना उत्तमोत्तम उद्योग क्षेत्रामध्ये काम करण्याची, प्रशिक्षणाची संधी केआयटी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जात आहे. त्यासोबत शिक्षणाचा दर्जा व विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक क्षमता सर्वोत्तम ठेवण्याबाबत आम्ही आग्रही आहे ”
- साजिद हुदली, अध्यक्ष केआयटी