पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रिन्स शिवाजी जाधववाडी शाळेचे यश
schedule17 Jul 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये महापालिकेच्या प्रिन्स शिवाजी जाधववाडी शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. कोणतेही जादा क्लास न लावता शाळेमध्ये झालेल्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाचे, विद्यार्थ्यांनी स्वतः केलेल्या मेहनतीचेआणि पालकांनी दिलेल्या साथीचे हे फलित आहे असे शाळा व्यवस्थापनने म्हटले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षिका सोनाली बाळकृष्ण मोरे यांनी मार्गदर्शन केले. नूरजहाँ खतीब व मुख्याध्यापक नितीन चौगुले व सर्व शिक्षक यांची प्रेरणा लाभली. गुणवत्ता यादीमध्ये नम्रता श्रीकांत कुंभार 250/300 (123 वी ), वैष्णवी संदीप चिपरे (२४८ गुण, १३०वी ), आरोही संभाजी पाडळकर (२४६ गुण, १५१ वी ), आश्लेषा नामदेव पोटळे, (२४६ गुण, १५३ वी ), सतेज अमोल माजगावकर (२४४ गुण, १९० वा ) यांचा समावेश आहे.