महिलांनी राजकीय साक्षर बनायला हवे –स्वयंसिद्धाच्या कांचन परुळेकर
schedule26 Dec 24 person by visibility 14 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :’ ‘महिलांना राजकीय साक्षर बनवायला हवे. त्याद्वारेच ग्रामीण नेतृत्व घडेल. सध्याच्या काळात महिलांनीही तंत्रस्नेही होणे गरजेचे आहे.’असे मत स्वंयसिद्धा संस्थेच्या संस्थापक कांचन परुळेकर यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज येथे विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेतर्फे श्रीमती परुळेकर यांना ‘कै. रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार’प्रदान करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला., ., संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. घाळी सांस्कृतिक सभागृह येथे कार्यक्रम झाला.
परुळेकर म्हणाल्या, ‘राजकारण्यांनी आपला सात-बारा आपल्या लेकी-सुनांच्या नावे केला आहे. यामुळे इतरांनीं काय करायचे ? पंधराशे रुपये देऊन कोणी लाडकी बहिण होत नाही. तेव्हा राजकारण्यांना योग्य ट्रॅकवर आणण्यासाठी महिलांनी जागे व्हायला हवे.’
संस्थेचे सहचिव प्रा. गजेंद्र बंदी यांनी स्वागत केले. प्राचार्य डॉ. दत्ता पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रा. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सचिव अॅड. बी. जी. भोसकी यांनी आभार मानले. यावेळी संचालक विकास पाटील, एस. एम. दड्डी, डॉ. शिवकुमार कोल्हापुरे, महेश घाळी आदी उपस्थित होते.