ईव्हीएम हटावसाठी कोल्हापुरात आम्ही भारतीय लोकतर्फे आंदोलन
schedule30 Nov 24 person by visibility 122 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव ’ या मागणीसाठी कोल्हापुरात शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’तर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळआंदोलन झाले. पुण्यामध्ये ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी
याप्रसंगी राष्ट्र सेवा दलाचे भरत लाटकर, माजी नगरसेविका भारती पोवार, राजेश लाटकर, काँग्रेसच्या पदाधिकारी सरला पाटील, बाबा इंदूलकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, यांनी ईव्हीएम हटावची मागणी केली. तसेच विधानसभा बरखास्त करून पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी यावेळी केली. झिंदाबाद झिंदाबाद संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, ईव्हीएम मुर्दाबाद, घाबरताय काय-उत्तर द्या’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भोगावती कारखान्याचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, संचालक मारुती जाधव, हिंदुराव चौगले, के. बी. पाटील, ए. डी. चौगले,दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, संभाजीराव जगदाळे, जनता दलाचे वसंतराव कांबळे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, प्राचार्य टी. एस. पाटील, बाबूराव कदम, भरत रसाळे, प्रा. सुभाष जाधव, बबन रानगे, अनिल घाटगे, दगडू भास्कर, सुभाष देसाई, रघुनाथ कांबळे, शिवाजीराव परुळेकर,धीरज डोंगळे, शफिक देसाई, हरिश मालपाणी, अशोक जाधव, बाजार समिती उपसभापती अमित कांबळे, पंडित कंदले, चंदा बेलेकर, टीना कांबळे, अनिता गवळी, विद्या निंबाळकर, वैशाली जाधव, आदींचा सहभाग होता.