क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांना अभिवादन
schedule26 Dec 24 person by visibility 11 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, ताराराणी विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष रंगरावदादा पाटील यांची १०५ वी जयंती कमला कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते रंगरावदादा पाटील यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्रा. डॉ. सुजय पाटील, प्रा. डॉ. नीता धुमाळ, ग्रंथपाल उर्मिला कदम, उपप्राचार्य एम. एन. जाधव, प्रा. एच. व्ही. पुजारी, प्रा. डी. ए. पाटील, प्रा. सुनील भुईंगडे, प्रा. मनीषा कदम, प्रा. माधवी माळी, प्रा. आर. पी. शिंदे, प्रा. एस. एच. कोकितकर आदी उपस्थित होते.