शनिवारी शाहू स्मारकमध्ये रंगणार मंगलगाणी -दंगलगाणी संगीत मैफिल
schedule25 Dec 24 person by visibility 126 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गायक शिक्षक मंचच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या गीतांची " मंगलगाणी -दंगल गाणी " ही संगीत मैफिल शनिवारी, (२८ डिसेंबर २०२४) सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवन येथे रंगणार आहे.
गेले अनेक वर्ष प्रेक्षकांना रुंजी घालणाऱ्या सदाबहार मराठी गीतांची मैफिल कराओके ट्रॅकच्या माध्यमातून सादर केले जाणार आहे. सर्वांसाठी प्रवेश खुला असल्याने प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैफिलीचा आनंद घ्यावा असे आवाहन , गायक शिक्षक मंचचे राजेंद्र कोरे,बाळ डेळेकर व रवींद्र सूर्यवंशी यांनी केले आहे. लता मंगेशकर,आशा भोसले, किशोर कुमार, महेंद्र कपूर,जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर,सचिन पिळगांवकर यांनी अजरामर केलेली गीते या कार्यक्रमात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सादर करणार आहेत.