शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक
schedule25 Dec 24 person by visibility 88 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर युवा सेना शहर पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कोल्हापुरातल्या तरुणांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा सेना कटिबद्ध राहील असा निर्धार करण्यात आला. तसेच महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने युवा सेनेचे पदाधिकाी ८१ वॉर्डमध्ये कार्यकर्त्यांची बांधणी व युवा सेनेची नोंदणी करण्याचे ठरले. युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मंजित माने, योगेंद्र माने, चैतन्य देशपांडे, बंडा लोंढे, कनिष्क शिंदे, कीर्ती कुमार जाधव, शुभम पाटील, विनय शिरसागर, माधुरी जाधव, प्रिया माने यांनी चर्चेत सहभाग घेलता. या आढावा बैठक साठी युवासेनेचे राजर्षी मिणचेकर, प्रज्ञा लोणारे, अक्षय घाटगे, अभिषेक दाबाडे, निलेश सूर्यवंशी, सुमीत मेळवंकी,सानिका दामूगडे, सार्थक कोलेकर, प्रथमेश रांगणे, सिद्धी दामूगडे,मुन्ना महात,अक्षय मोरे, आकाश शिंदे कार्यकर्ते उपस्थित होते.