Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इंडिया आघाडीतर्फे रविवारी दसरा चौक ते माणगावपर्यंत सन्मान बाइक रॅलीजिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे रेकॉर्ड तयार होणार, शिक्षण विभागातर्फे मिशन विद्याभूमीउपक्रम !पंचगंगा नदी मरणासन्न होत असताना अधिकाऱ्यांनी काय उपाययोजना केल्या ! पंकजा मुंडेंचा सवालशिवाजी विद्यापीठ महिला क्रिकेट स्पर्धेत शहाजी महाविद्यालयाची हॅटिट्रकप्रभात-रॉयल थिएटर बनले पीआर सिनेप्लेक्स, एक पडदा चित्रपटगृहाला मल्टिप्लेक्सचा लूककोल्हापूरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट-क्षीरसागरांची क्रीडाईच्या पदाधिकाऱ्यांना ग्वाहीआयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर दिसणार  लंडन ब्रिज- युरोपियन स्ट्रीट डॉ. जे. के. पवार यांच्या साहित्यकृतीस राज्य साहित्य विशेष पुरस्कार प्रदानभारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी वर्धापनदिन उत्साहात साजरातपोवन मैदान येथे शुक्रवारपासून सतेज कृषी-पशुपक्षी प्रदर्शन

जाहिरात

 

अटलजींनी पाहिलेले स्वप्न पूर्ण होत असल्याचा अभिमान-आमदार सुधीर गाडगीळ

schedule25 Dec 24 person by visibility 64 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारतीय जनता पार्टी संघटनात्मक काम करणारी पार्टी आहे. लोकसभेमध्ये दोन सदस्य ते  आज देशातील एक नंबरचा पक्ष त्याचबरोबर जगभरातील सर्वात मोठा सदस्य असणारा पक्ष अशी वाटचाल करणाऱ्या भाजपाचे स्वप्न अटलजींनी पाहिले होते ते आज त्यांच्या जयंती दिनी पूर्ण होत आहे या गोष्टीचा अभिमान आहे.’असे मत आमदार सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयात कोल्हापूर महानगरतर्फे भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा झाली. या अभियानासाठी प्रभारी म्हणून आमदार गाडगीळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त अटलजींच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी आमदार गाडगीळ व आमदार अमल महाडिक यांचा सत्कार जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

खासदार धनंजय महाडिक यांनी लोकसभा अधिवेशनातील विषयांवर चर्चा करत सध्या देशभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काँग्रेस राजकारण करत आहे. काँग्रेस करत असलेला अपप्रचार भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हाणून पाडला पाहिजे असे सांगितले.  जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी भाजपा सदस्य नोंदणीसाठी आपण सर्वांनी ८८००००२०२४ या क्रमांकावर कॉल करून जास्तीत जास्त सदस्यता नोंदणी करावी तसेच हे अभियान शहराच्या सात मंडलामध्ये मोठ्या प्रमाणावर राबवण्याचे आवाहन कार्यकर्त्याना केले.प्रदेश कार्यकारिणी  सदस्य राहुल चिकोडे यांनी सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळेची रूपरेषा स्पष्ट केली.  भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव यांनी सदस्यता नोंदणी अभियानाची बदलती पद्धत व आगामी कार्यक्रमासंबंधी माहिती दिली. 

याप्रसंगी अशोक देसाई, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, उमा इंगळे, माधुती नकाते, धनश्री तोडकर, विजयसिंह खाडे-पाटील, भरत काळे, दिग्विजय कालेकर, अमर साठे, मंगला निपाणीकर, संगीता खाडे, सुधीर देसाई, सचिन कुलकर्णी, अभिजित शिंदे, प्रकाश सरनाईक, विशाल शिराळकर, सतीश घरपणकर, गिरीश साळोखे, अनिल कामत,  आजम जमादार, संतोष माळी, संदीप कुंभार, सयाजी आळवेकर, किरण नकाते, दिलीप मेत्राणी, अमोल पालोजी, रविकिरण गवळी आदी उपस्थित होते. 

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes