Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!

जाहिरात

 

कळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!

schedule04 Mar 26 person by visibility 14 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कळंबा आणि पाचगाववासियांसाठी हक्काचा पाणीसाठा असलेल्या कळंबा तलाव पात्रात खुलेआम कचरा, टाकाऊ वस्तू टाकली जात आहे. तलाव पात्रात ठिकठिकाणी खरमाती ओतून ढिगारे तयार केले आहेत. पावसाळया पाणी साचणाऱ्या तलाव पात्रातच हा सारा कचरा पडून आहे. मात्र कळंबा आणि पाचगाव ग्रामपंचायतीचे कळंबा तलावाच्या स्वच्छतेकडे पूर्णता दुर्लक्ष आहे. तसेच महापालिकेचे कामकाजही या तलावाशी काही संबंध नसल्यासारखा आहे. तलाव पात्रात कचरा टाकणाऱ्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई कळंबा, पाचगाव  ग्रामपंचायत व महापालिका प्रशासनाकडून होत नाही. हा परिसर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात उपाययोजना होत नाहीत. कळंबा तलाव सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. पण तलाव परिसर प्लास्टिक पिशव्या मुक्त असावा, कचरा टाकणाऱ्यावर निर्बंध लादावेत अशा पद्धतीने कारभार होताना दिसत नाही. सांडव्याला लागूनच तलाव पात्रात टाकाऊ साहित्य, खरमाती, कचऱ्याच्या भरलेल्या पिशव्या टाकल्या आहेत. प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्या ठिकठिकाणी विखुरल्या आहेत. कचरा टाकणाऱ्यांवर कोणत्याही स्वरुपाची कारवाई होत नसल्यामुळे येथे खरमातीचे ढिगारे तयार झाले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes