Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चाकळंबा तलावात कचरा, टाकाऊ वस्तू, खरमातीचा ढिगारा ! कळंबा -पाचगाव ग्रामपंचायतीचे पूर्णत: दुर्लक्ष!!कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखातजुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!

जाहिरात

 

जात प्रमाणपत्रे खोटी, नगराध्यक्षसह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेविकेंवर गंभीर आरोप, नऊ मार्चला कोल्हापुरात मोर्चा

schedule04 Mar 26 person by visibility 39 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एससी जातीचे खोटे दाखले काढून आरक्षण लाटणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात व आर्थिक व्यवहार करून एससीचे खोटे दाखले देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे या मागणीसाठी कोल्हापुरात नऊ मार्च २०२६ रोजी संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्यावतीने आंदोलन पुकारले आहे.  खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर करणाऱ्या विरोधात हा मोर्चा असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी आमदार राजीव आवळे, उत्तम कांबळे नगरसेवक दुर्वास कदम, शिवाजी कवाळे, डी.जी. भास्कर, सुभाष देसाई, प्रेमानंद मौर्य आदींनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत आंदोलनाची माहिती दिली. ‘पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश पाटील यांनी अनुसूचित जाती (एससी-लिंगडेर) प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हा परिषद निवडणूक लढवून सत्तेत प्रवेश केला आहे. तसेच गडहिंग्लज-नगराध्यक्ष महेश महादेव तुरबतमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांनीही एससी आरक्षणाच्या जागांवर बोगस जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून संवैधानिक आरक्षण व्यवस्थेचा उघड गैरवापर केला आहे.’असे आरोप यावेळी समितीने केले. संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करावीत, त्यांची पदे बरखास्त करावीत आणि दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी, अशी समितीची ठाम मागणी आहे. या सर्व मागण्यासाठी संघर्ष महामोर्चा आयोजित केला आहे. पत्रकार परिषदेला डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल माने, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर ,श्रीकांत मोरे, प्रमोद कदम, राजेंद्र ठीकपुर्लीकर, बाळासाहेब भोसले, पांडुरंग कांबळे,भाऊसो काळे, दत्ता मिसाळ, जयसिंग पाडळीकर, बाळासाहेब वाशीकर, प्रदीप मस्के,अशोक घाडगे,हरी कांबळे,सुभाष कांबळे, संदीप हेर्लेकर, प्रज्योत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. वैभव प्रधान यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes