कैलासगडची स्वारी मंदिर पालखी सोहळा दिमाखात
schedule04 Mar 26 person by visibility 25 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आठदिवसीय सोहळातंर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होत. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, अभिषेक आणि शिवशंकराचा जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. धनगरी ढोल, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, झांजपथक आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळयाचे आयोजन केले होते. मार्गावर फुलांच्या पायघडया होत्या.
मंगळवारी सांयकळी पालखी सोहळा पार पडला. तत्पूर्वी वल्लभआनंद सरस्वती स्वामी, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, मंदिराचे अध्यक्ष व नगरसेवक सत्यजीत चंद्रकांत जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. माजी नगरसेवक संभाजी जाधव, उपाध्यक्ष केशव पोवार, महादेव यादव, विलास गौड, मंदिराचे पुजारी विठठलराव जाधव, गणेश भोसले, उदय कारंजकर, दीपक जाधव, कुलदीप भोसले, अजित जाधव, ओंकार जाधव, अजित आयरेकर, संतोष मोरे, रोहित कारंडे, कमलाकर भोसले आदी उपस्थित होते.
पालखी मिरवणुकीत धनगरी ढोल पथक, हलगी पथक, शिवालय भजनी मंडळाचा सहभाग होता. प्रारंभी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर झाली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी पालखीचे पूजन केले. पाटाकडील तालीम मंडळ, देवणे गल्ली, खासबाग चौक, भोसले गल्ली मार्गे पालखी पुन्हा मंदिरात पोहोचली. मंदिर वर्धापनदिन सोहळयानिमित्त महाप्रसादचे आयोजन केले होते. उपमहापौर अक्षय जरग, नगरसेविका निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झाले.