महापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!
schedule02 Mar 26 person by visibility 72 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती, आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती –उपसभापतींची निवड ११ मार्च २०२६ रोजी होत आहे. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजल्यापासून निवड प्रक्रियेला प्रारंभ होईल. पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. महापौर, उपमहापौर निवड, समिती सदसयांची निवड झाल्यानंतर महापालिकेने सभापती व उपसभापती निवडीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तारीख व वेळ मिळावी यासंबंधी पत्र व्यवहार केला होता. महापालिकेच्या वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत स्थायी, परिवहन व महिला-बालकल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची सत्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी निवडणूक लढविली होती. जनसुराज्य शक्ती पक्षाचाही महायुतीला पाठिंबा आहे. तर विरोधात काँग्रेस आघाडी आहे. ८१ सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे ४६ सदस्यांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे ३४ व शिवसेना ठाकरे पक्षाचा एक नगरसेवक