Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
उमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर प्रज्ञाशोध चाळणी परीक्षा ३५५ केंद्रावर कृष्णराज महाडिकांची कोल्हापुरात जल्लोषी मिरवणूक ! न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे वार्षिक स्नेहसंमेलन कलापर्व जल्लोषातजिल्हयातील १८ ग्रामपंचायतींना एक लाखाचे प्रोत्साहनपर बक्षीस

जाहिरात

 

शाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठक

schedule02 Mar 26 person by visibility 31 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील शाहू मिल येथे राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीबाबत गुरुवारी, पाच मार्च २०२६ रोजी मंत्रालयात बैठक होत आहे. अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे,  ‘ शाहू मिल जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारून परिसर सुशोभित करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ मागवून घेवून त्यास महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२६ मध्ये निधीची तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या कोल्हापुरातील शाहू छत्रपती मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाकरिता जागेचे हस्तांतरण करणेबाबत वस्त्रोद्योग मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथे पाच मार्च रोजी दुपारी २.३० वाजता बैठक होत आहे. या बैठकीस पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी कोल्हापूर, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका, वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त, सामान्य प्रशान विभागाचे उपसचिव, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आदी उपस्थित राहणार आहेत

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes