Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेसाठी फेब्रुवारीला मतदान ! मतमोजणी फेब्रुवारीला !!प्रभाग क्रमांक अकरामध्ये भगवे वातावरण ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन, रॅलीत हजारोंचा सहभाग ! !दमसातर्फे पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहनजिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आज दुपारी घोषणासत्तेचा मुकुट नव्हे तर माझ्यासाठी जनतेचे प्रेम महत्वाचे – आमदार सतेज पाटीलजनतेच्या विश्वासाच्या लाटेवर सत्यजित जाधवांचा विजय निश्चित - डॉ. दश्मिता जाधव देवेंद्र फडणवीसांची राजेश क्षीरसागरांच्या निवासस्थानी भेट हद्दवाढीमुळेच शहराचा विस्तार- विकास, कोल्हापुरात औद्योगिक इको सिस्टीम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्टाचा आदेश पालकमंत्र्यांची रामानंदगरमध्ये सभा, रायगड कॉलनीतील प्रचारफेरीला प्रतिसाद

जाहिरात

 

प्रभाग क्रमांक अकरामध्ये भगवे वातावरण ! महायुतीचे शक्तीप्रदर्शन, रॅलीत हजारोंचा सहभाग ! !

schedule13 Jan 26 person by visibility 29 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, महायुतीच्या विजयाच्या घोषणा, हलगीचा कडकडाट आणि मतदारांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा जल्लोषी वातावरणात प्रभाग क्रमांक ११ मधील महायुतीच्या उमेदवारांची प्रचारफेरी काढण्यात आली. मंगळवारी, प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महायुतीने प्रचंड रॅली काढत शक्तीप्रदर्शन केले. भगवे झेंडे, गळयात भगव्या रंगाच्या मफलरी, महायुतीच्या विजयाच्या घोषणा यामुळे वातावरण भगवेमय बनले होते.

प्रभाग क्रमांक अकरामध्ये विविध भागातून ही रॅली निघाली. महायुतीचे उमेदवार सत्यजीत जाधव, माधुरी नकाते, यशोदा मोहिते, निलांबरी साळोखे यांच्या प्रचारार्थ या रॅलीचे आयोजन केले होते. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. शिवसेना उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव, डॉ. दश्मिता जाधव यांच्यासह भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेषत महिला मतदारांचा रॅलीतील सहभाग लक्षणीय होता. रावणेश्वर मंदिर, तुकाराम माळी तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ परिसर,मंडलिक गल्ली, संभाजीनगर, टिंबर मार्केट, राजाराम चौक, फिरंगाई हास्पिटल, लाड चौक मार्गे रॅली शाहू बँक परिसर येथे पोहोचली. या रॅलीमध्ये प्रभागातील मतदारांचा सहभाग लक्षणीय होते. रॅलीमध्ये प्रसाद जाधव, पवित्रा रांगणेकर, गणेश रांगणेकर, गणेश देसाई, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, निलेश गायकवाड, नितीन जौंदाळ, व्यंकटेश कालेकर,रोहित कारंडे, आकाश चव्हाण, चेतन मोहिते, गिरीष साळोखे, माजी नगरससेवक किरण नकाते यांच्यासह मतदार मोठया संख्येने सहभागी होते.

………….

“ महायुतीच्या उमेदवारांना मतदारांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागात सगळीकडे अनुकूल वातावरण आहे. विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांना भेटलो. प्रचार कालावधीत अनेक घटकांनी पाठबळ दिले. उमेदवारीचे स्वागत केले. प्रचार फेरीत महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कष्ट घेतले. महायुतीच्या चारही उमेदवारांना बळ देण्याचे काम केले. साऱ्यांचे शतश आभार.”

 

  • सत्यजीत जाधव, उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा महायुती

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes