पालकमंत्र्यांची रामानंदगरमध्ये सभा, रायगड कॉलनीतील प्रचारफेरीला प्रतिसाद
schedule12 Jan 26 person by visibility 43 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरात विविध ठिकाणी सभा घेत आहेत. प्रचारफेरी काढत आहेत. प्रभाग क्रमांक १९ मध्ये त्यांनी रामानंदनगर येथे सभा घेत नागरिकांना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. महायुतीच उमेदवार राहुल चिकोडे, विजय खाडे, मानसी लोळगे, रेणू माने यांना नागरिकांनी निवडून देत शहराच्या विकासाचे भागीदार बनावे असे आवाहन केले. राज्यात आणि केंद्रात भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. कोल्हापूर शहराचा विकास साधण्यासाठी महायुतीची सत्ता गरजेची आहे. महायुतीच्या उमेदवारांना शहरात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी जोतिर्लिंग कॉलनी, योगेश्वर कॉलनी, रायगड कॉलनी येथे प्रचारफेरी काढली. यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग होता. महायुतीच्या विजयाच्या घोषणा देत विविध भागातून फेरी निघाली.