दमसातर्फे पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन
schedule13 Jan 26 person by visibility 18 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत.एक जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेली पुस्तके ३१ जानेवारी २०२६ पर्यत पाठवावीत असे आवाहन केले आहे. दमसाच्यावतीने कोल्हापूर, सांगली,सातारा, सोलापूर या जिल्ह्यासह बेळगाव परिसरातील लेखकांच्या उत्कृष्ट साहित्यकृतींना दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात. देवदत्त पाटील पुरस्कार(कादंबरी),अण्णा भाऊ साठे पुरस्कार (कथा,ललित),शंकर खंडू पाटील पुरस्कार (कथासंग्रह), कृ.गो.सूर्यवंशी पुरस्कार ( वैचारिक, संशोधन ) शैला सायनाकर पुरस्कार ( कवितासंग्रह), चैतन्य माने पुरस्कार(प्रथम प्रकाशन) याबरोबरच बालवाडःमय पुरस्कारही देण्यात येतो.इच्छुक लेखक, प्रकाशक यांनी पुस्तकाच्या दोन प्रती ,फोटो आणि परिचय अर्जासोबत ३१जानेवारी २०२६पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, जी-६, स्मृती आपर्टंमेंट, बाबूजमाल रोड,सरस्वती टाँकीजवळ, कोल्हापूर ४१६००२ या पत्यावर पाठवावे.अधिक माहितीसाठी कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, (९८५०४३३८०७) यांच्याशी संपर्क साधावा.