पंधरा फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्या : सुप्रीम कोर्टाचा आदेश
schedule12 Jan 26 person by visibility 105 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : लांबलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंधरा फेब्रुवारी २०२६ पर्यंत घ्या असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश दिले होते. दरम्यान राज निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे धाव घेत तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी याचिका दाखल केली होती.निवडणूक आयोगाने दहा फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मागितली होती. त्यावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेशात म्हटले आहे. १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका पूर्ण कराव्यात असे काेर्टाने म्हटले आहे.