जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आज दुपारी घोषणा
schedule13 Jan 26 person by visibility 265 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बहुप्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी, तेरा जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने, दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलाविली आहे. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश् राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपर्यंत आहे, अशा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा होणार असल्याचे वृत्त आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणाची मर्यादा 50 टक्केपेक्षा अधिक आहे, तेथे दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत.