केडीसीसीच्या संचालकांची लंडन हाऊसला भेट ! हा आयुष्यातील आनंदाचा दिवस -हसन मुश्रीफ
schedule17 Sep 25 person by visibility 61 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन : ‘लंडनमध्ये उच्च शिक्षणासाठी राहिलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने लंडन हाऊस ही वास्तू पावन झालेली आहे. लंडन हाऊसला भेट हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा दिवस आहे. या वास्तूला भेट देऊन कृतार्थ झालो,’ अशी भावना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. मंत्री मुश्रीफ यांच्यासह केडीसीसी बँकेच्या संचालक मंडळांने लंडनमध्ये लंडन हाऊसला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माजी आमदार राजू आवळे, आमदार डाॅ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, माजी आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, प्रताप माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, राजेश पी. एन. पाटील, माजी संचालक असिफ फरास, युवराज गवळी, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी प्रमुख उपस्थित होते.