Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

    २०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सवलतीसाठी सरकार सकारात्मक- शिक्षणमंत्री दादा भुसे

schedule16 Sep 25 person by visibility 22265 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २०१३ पूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेले शिक्षकांना टी.ई.टी. परीक्षेतून सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.  याबाबत केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री भुसे यांची भेट घेतली. टीईटी परीक्षा अनिवार्य करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच संघटनेच्या मागणीनुसार शंभर टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.

  संघटनेने, यावेळी बी.एल.ओ.च्या कामाचा शिक्षकांना प्रचंड त्रास होत असून हे फक्त शिक्षकाला दिले जाते बाकी कर्मचाऱ्यांना वगळले जात आहे हा मुद्दा मांडला त्यावर मंत्री भुसे यांनी निवडणूक आयोगाकडे शिक्षकांकडील हे काम कमी करण्यासाठी चर्चा करू असे सांगितले. शिक्षण सेवक पद रद्द करावे, जिल्हा परिषद सर्वच शाळांना शंभर पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता  पाचवी व आठवी चे वर्ग विना अट जोडावेत, कार्यरत शंभर  विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यासंबंधी चर्चा केली. शिष्टमंडळात राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्य संघटक पी.आर . पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के.पाटील, वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, प्रदीप गावंडे, भाऊराव शिंदे, प्रमोद मुक्केमवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिराम येळणे, अमरावती कार्याध्यक्ष गोकुळ चारथळ, नितीन पेंढेकर, विजय सावळे उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes