पी.एस. घाटगे यांचा खासगी शिक्षक महासंघात प्रवेश ! राज्य प्रवक्तापदी निवड !!
schedule16 Sep 25 person by visibility 9 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नागोजीराव पाटणकर विद्यालयाचे मुख्याध्यापक परशराम घाटगे तथा पी.एस.घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघामध्ये जाहीर प्रवेश केला. महासंघाचे राज्य सल्लागार एम.डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात घाटगे यांचा प्रवेश झाला. प्रवेशानंतर घाटगे यांची महासंघाच्या राज्य प्रवक्तापदी निवड करण्यात आल्याची घोषणा महासंघाचे राज्याचे अध्यक्ष राजेंद्र निकम व मुख्य सचिव विठ्ठल उरमुरे यांनी केली.
" खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षक मुख्याध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तिक व सामुदायिक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडविले जातात. म्हणून यापुढे महासंघाच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचे " घाटगे यांनी सांगितले. महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष व विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासनाधिकारी प्रदीप मगदूम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ,कोल्हापुरी फेटा देऊन घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी. आर. पाटील, दस्तगीर मुजावर शहराध्यक्ष संतोष पाटील, सागर जाधव, रवींद्र नाईक, धीरज पारधी, अभिजीत साळोखे, संतोष कुंभार, गौतम कांबळे उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष टी.आर.पाटील यांनी प्रास्ताविक केले. करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे यांनी सूत्रसंचालन केले. दशरथ कुंभार यांनी आभार मानले. यापूर्वी घाटगे यांनी खासगी प्राथमिक शिक्षक-समितीचे भरत रसाळे यांच्या शिक्षक समितीतील जुने कार्यकर्ते व माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. घाटगे यांच्या महासंघातील प्रवेशामुळे रसाळे यांना धक्का आहे असे महासंघाचे म्हणणे आहे.