क्रिडाई कोल्हापूरतर्फे अभियंता दिनी रक्तदान शिबिर
schedule16 Sep 25 person by visibility 11 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : क्रिडाई कोल्हापूरतर्फे सर मोक्षगुडंम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन हा अभियंता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून क्रिडाईतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात क्रिडाई कोल्हापूर चे पदाधिकारी, सभासद, युथ विंग, वुमेन्स विंग सदस्य व क्रिडाई कोल्हापूरच्या सभासदांनी रक्तदान केले.
क्रिडाई कोल्हापूर चे अध्यक्ष के.पी.खोत, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, उपाध्यक्ष चेतन वसा, सचिव गणेश सावंत, खजानिस अजय डोईजड, संचालक चेतन चव्हाण, सुनिल चिले , मौक्तीक पाटील, महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे, क्रिडाई कोल्हापूर युथ विंग प्रणव क्षीरसागर, सभासद विश्वजीत जाधव, संतोष पाटील,मौसीन मुल्लानी यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सभासद अनंत मुरगूडे यांनी आज अखेर ११६ वेळा, संदिप मिरजकर यांनी 30, सचिन घाटगे यांनी २६ वेळा रक्तदान केले.
तसेच या शिबिरासाठी महालक्ष्मी ब्लड बँकचे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे व सहकाऱ्यांनी नियोजन केले. या कार्यक्रमास कारवाचे चेअरमन रत्नेश शिरोडकर, महालक्ष्मी ब्लड बँक चे प्रमुख डॉ विजयकुमार बर्गे व स्टाफ, डॉ डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजच्या सुपरिडेंट डॉ. वैशाली गायकवाड, क्रिडाई कोल्हापूर चे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सहखजानिस श्रीराम पाटील, सहखजानिस सागर नालंग, संचालक गौतम परमार, प्रदीप भारमल, आदित्य बेडेकर, अमोल देशपांडे, संग्राम दळवी,सुनिल चिले, क्रिडाई कोल्हापूरचे माजी अध्यक्ष महेश यादव. जेष्ठ सभासद श्रीनिवास गायकवाड, कृष्णा पाटील, श्रेयांस मगदूम, संजय डोईजड,सचिन घाटगे उपस्थित होते.