डेप्युटी सीईओ ओमप्रकाश यादवांना मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर
schedule17 Sep 25 person by visibility 50 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठवाडा समन्वय समितीतर्फे मराठवाडा मुक्तीदिन महोत्सव आयोजित केला आहे.बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे बुधवारी (१७ सप्टेंबर २०२५) सायंकाळी पाच वाजता विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमात मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे प्रमुख अतिथी आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील महात्मा गांधी मिशन संस्थेचे सचिव अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती आहे.
या समारंभात सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय,पत्रकारिता, कृषी, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांना मराठवाडा भूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, लातूर जिल्ह्यातील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानचे संस्थापक हरिश्चंद्र सुडे, नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ, श्री इंजिनीअर्स कात्रज येथील उद्योजक राजेंद्र नारायणपुरे, बीड जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय जाधव, पत्रकार राहुल कुलकर्णी यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे.