दक्षिणचे अपक्ष उमेदवार वसंत पाटील यांचा अमल महाडिकांना पाठिंबा
schedule11 Nov 24 person by visibility 88 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार, कंदलगावचे माजी सरपंच वसंत जिवबा पाटील यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपाई घटक पक्ष महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांना जाहीर पाठिंबा दिला.
अमल महाडिक यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार केला. सत्ता असताना आणि नसताना सुद्धा गेली १० वर्ष अमल महाडिक यांनी खासदार फंड आणि आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर केलेले कामाचा आदर राखून हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सगळ्यांना_कळून_चुकलंय- दक्षिणचं_वारं_फिरलंय ‘ याचीच प्रचिती येत असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी नमूद केले . कंदलगाव परिसरातून अमल महाडीक यांनी विक्रमी संख्येने मतदान होईल असा विश्वासही त्यानी व्यक्त केला. याप्रसंगी सरपंच राहूल पाटील, विलास यादव, योगेश यादव, ग्रा. सदस्य राजाराम तळेकर, आरती योगेश यादव,रोहिणी वसंत पाटील, रोहन देसुरकर, संदिप पाटील,धनाजी पाटील पाडळीकर,ओमकार रथकाडे,सागर पाटी, ग्रा.सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते