धनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छा
schedule12 Jun 25 person by visibility 82 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा बारा जून रोजी वाढदिवस. समर्थकांनी, मित्रांनी त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला. सामाजिक उपक्रमांची जोड देत या दिवसाचा गोडवा आणखी वाढविला. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार धनंजय महाडिक यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मुलाच्या वाढदिवसानिमित्त खासदार महाडिक यांनी व्यक्त केलेल्या भावना, दिलेल्या शुभेच्छा हटके ठरत आहेत. सोशल मिडियावर खासदार महाडिक यांची शुभेच्छांची पोस्ट आहे.
खासदार महाडिक यांनी म्हटले आहे, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कृष्णा !! एक क्षण डोळे मिटले…आणि पाहता-पाहता जिथे एक लहानसा मुलगा उभा असायचा, तिथे आता एक उमदा तरुण दिसतो. आज मी तुला उचलून कुशीत घेऊ शकत नसलो तरी, तुला मी हृदयात सामावून घेतले आहे.
तू जेव्हा जेव्हा काही चांगलं केलसं, तेव्हा मला तुझा अभिमान वाटला. पण सगळया जास्त अभिमान वाटतो, तो म्हणजे ‘तो माझा मुलगा आहे’असे इतरांना सांगताना. कृष्णा, तुला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा आणि आशिर्वाद. तुझा दिवस आनंदी जावो. आणि आई अंबाबाईची सदैव कृपा तुझ्यावर राहो !!’