आता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !
schedule12 Jun 25 person by visibility 70 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नगरपालिका, नगरपंचायत, महापालिकेपाठोपाठ आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना काढण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. सभागृहाची मुदत संपून तीनहून अधिक वर्षे झाली. ग्रामविकास विभागाने प्रभार रचना करण्याचे आदेश काढले आहेत. जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात एका मतदारसंघाची भर पडण्याची शक्यता आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी ६७ मतदारसंघ होते. यंदा ६८ मतदारसंघ होतील अशी शक्यता आहे.