Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
रविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या धर्तीवर सीपीआरचा कायापालट- मंत्री हसन मुश्रीफमुंबईतील सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी पुन्हा गोकुळ तुपाची पसंती !राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमकसतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटपधनजंय महाडिकांच्या कृष्णराजला हटके शुभेच्छाआता धुमशान मिनी मंत्रालयसाठी, प्रभार रचना करण्याचे आदेश !कोल्हापुरात ढगफुटी, वीज कोसळली ! शहर जलमय, पाण्यात मुलगा वाहून गेला !!

जाहिरात

 

राहुल रेखावारांच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने, शिक्षक संघटना कारवाईसाठी आक्रमक

schedule13 Jun 25 person by visibility 958 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणेचे संचालक राहुल रेखावर यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी कोल्हापुरात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या. विविध शिक्षक संघटनेच्या नेते मंडळींनी एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी 13 जून रोजी निदर्शने केली. प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे त्यामुळे रेखावार यांच्याकडून संचालक पद काढून घ्यावे आणि रत्नागिरी जवळ झालेल्या शिक्षकांच्या मिनी बस अपघाताला त्यांना जबाबदार ठरवून  गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले.
 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेतर्फे राज्यभर कला  व   क्रीडा शिक्षकांचे दोन जून ते 12 जून या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षण ऑनलाईनला काही शिक्षक पहिल्या दिवशी उशिरा आले त्यामुळे त्यांना यामध्ये सामावून घेतले नाही. शिवाय ऑनलाइनच्या नावाखाली ऑफलाईन काम सुरू आहे. मात्र ऑनलाईनचे कारण दाखवून प्रत्येक शिक्षकाकडून दोन हजार रुपयाची शुल्क आकारणी केली आहे. त्या मोबदल्यात शिक्षकांना चहा, भोजन या सुविधा पुरविल्या नाहीत. ऑनलाईन प्रशिक्षणाला सर्व्हर डाऊनचाही फटका बसला. प्रशिक्षण कालावधीत चिपळूणमधून रत्नागिरीकडे जाणाऱ्या 30 शिक्षकांच्या मिनी बसला अपघात झाला. त्यामध्ये शिक्षक  जखमी झाले. या साऱ्याला संचालक रेखावर हेच कारणीभूत आहेत असा आक्षेप ठेवत त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून शिक्षक संघटना सरसावले आहेत.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन झाले. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड, शिक्षक नेते भरत रसाळे, दादासाहेब लाड आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. या आंदोलनात शिक्षक नेते खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील, सी एम गायकवाड, शिवाजी माळकर,  राजेंद्र कोरे, राजेश वरक, सुधाकर सावंत, उमेश देसाई, संतोष आयरे, आर डी पाटील, महादेव डावरे, कुमार पाटील, सुधाकर निर्मळे, मुख्याध्यापक संजय पाटील, शिक्षक संजय पाटील, दिलीप माने, मिलिंद बारवडे, सविता जानकर, सुलक्षणा मुळे,  सविता गिरी, मनोहर जाधव आदींचा सहभाग होता.  " प्रा. सुभाष जाधव, बाबा पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ, प्राथमिक शिक्षक संघाचे रवी पाटील, शिक्षक समितीचे प्रमोद तौंदकर यांनीही उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. " शिक्षक एकजुटीचा विजय असो, राहुल रेखावर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, त्यांचे संचालक पद काढून घ्यावे, लडके लेंगे हमारा हक्क  '' अशा घोषणा देण्यात आल्या. शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले, संचालक राहुल रेखावार यांच्या हेकेखोर स्वभावामुळे शिक्षकांसाठी आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण हे आनंददायी न होता त्रासदायक ठरले आहे. त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी."

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes