Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवससंजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कारजनता आमच्यासोबत, कोणी गेले -आले तर फरक पडत नाही : सतेज पाटीलरविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन

जाहिरात

 

मुंबईतील सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी पुन्हा गोकुळ तुपाची पसंती !

schedule13 Jun 25 person by visibility 80 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला यंदा २०२५-२६ या वर्षासाठी मुंबईच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून एकूण २८० मेट्रिक टन गाय तुपाच्या पुरवठ्याची ऑर्डर पुन्हा मिळाली आहे. या संधीचे औचित्य साधून गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या १० मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचे पूजन गोकुळचे  चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चेअरमन मुश्रीफ म्हणाले, गोकुळने आपल्या स्थापनेपासून दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या गुणवत्तेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गोकुळ गाय तुपाचा दर्जा, सात्विकता आणि नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने सलग दुसऱ्या वर्षी आम्हाला पसंती दिली आहे. हे फक्त गोकुळचं नव्हे, तर आमच्या लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेलं प्रमाणपत्र आहे.

या वर्षी मिळालेल्या नवीन २८० मेट्रिक टन ऑर्डरनुसार गोकुळकडून दरमहा सरासरी २४ मेट्रिक टन गायीचे शुद्ध तूप सिद्धिविनायक मंदिरास पाठविण्यात येणार आहे. यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल.संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, संगणक व्यवस्थापक अरविंद जोशी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील, प्रकाश आडनाईक, लक्ष्मण धनवडे, उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes