Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डीवाय पाटील हॉस्पिटलचा सन्मानमनसे कोल्हापूर शाखेतर्फे रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे प्रदानगोकुळचे लक्ष म्हैस दुधाच्या बाजारपेठेवर, दूध उत्पादन  वाढीसाठी राबविणार विविध योजनापंचशील हॉटेल चौकात युवासेनेचे अनोखे आंदोलन, वाहतूक शाखेला निवेदनजोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवससंजय घोडावत इन्स्टिट्यूटला बेस्ट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट ऑफ द इयर २०२५ पुरस्कारजनता आमच्यासोबत, कोणी गेले -आले तर फरक पडत नाही : सतेज पाटीलरविवारी सेट परीक्षा, कोल्हापूर परिसरात २६ सेंटरची सुविधावाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंधशाळा बंद पाडणारा मार्च २०२४ चा संचमान्यतेचा जीआर रद्द करा, कोल्हापुरात शिक्षकांचे जोरदार आंदोलन

जाहिरात

 

वाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड , विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला वह्यांचा सुगंध

schedule13 Jun 25 person by visibility 90 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नेत्यांचा वाढदिवस म्हटलां की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला ऊधाण, फटाक्यांची आतषबाजी, शहरभर फलकांची उभारणी, शुभेच्छा देण्यासाठी झुंबडहे सार्वत्रिक चित्र. कोणत्याही पक्षाचा नेता याला अपवाद नाही. अशा स्थितीतही काँग्रेसचे  विधान परिषदेतील गटनेते व जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसाच्या समारंभाला विधायक कार्याची जोड देत ‘शुभेच्छाला हार-बुके नकोत, द्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वह्या’अशी संकल्पना राबविली. या संकल्पनेला केवळ कार्यकर्त्यांनी नव्हे तर समाजातील अनेक घटकांनी हात दिला. साऱ्यांच्या सहभागातून  लाखो वह्या संकलित होऊ लागल्या. २००७ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला यंदा पंधरा वर्षे होत आहेत. यावर्षी सह्या लाख वह्या संकलित झाल्या. त्या वह्यांचे शनिवारी (१४ जून २०२५) विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

वाढदिवसाला विधायक कामाची जोड मिळावी हा उद्देश ठेवून वह्या संकलनाला सुरुवात झाली. २००७ ते २०२५ असा गेली पंधरा वर्षें हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे. या कालावधीत तब्बल ६४ लाख ३७ हजार  वह्या संकलित झाल्या. ही आकडेवारी २०२४ पर्यंतची आहे. या सकंलित वह्या १४ लाख ५३ हजार ९६५ विद्यार्थ्यांना वितरित केल्या. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राबविलेल्या या उपक्रमाची नोंद, लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली. २०१६ मध्ये वर्ल्ड रेकॉर्डस इंडियानेही या उपक्रमाची दखल घेतली.  या उपक्रमात समाजातील विविध घटकांनी आपआपल्या परीने भर घातली. कोण व्यक्तिगत स्वरुपात तर कोण संस्था, संघटनात्मक पातळीवर वहया जमा केल्या आहेत.

१२ एप्रिल हा सतेज पाटील यांचा वाढदिवस. यादिनी त्यांना शुभेछा देण्यासाठी गर्दी उसळते. शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या हाती वह्या असतात. २०२५ मध्ये सहा लाख वह्या जमल्या. त्या वह्यांचे वाटप शनिवारी होत आहे. ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनात सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लाइक फॉर लाइक या टॅगलाईनखाली राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात वाचन, योगासन आणि छंद याद्वारे  जगणे सुंदर बनवू या अशी साद घातली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes