सतेज पाटील यांच्या वाढदिवसाला जमलेल्या वह्यांचे शनिवारी वाटप
schedule13 Jun 25 person by visibility 34 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे उद्या शनिवारी, १४ जून २०२५ रोजी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवनात सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे, माजी आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत. लाईक फॉर लाईक या टॅगलाईनखाली राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमात वाचन, योगासन, निसर्ग मैत्री आणि छंद याद्वारे आपले जगणे सुंदर बनवूया अशी साद घालण्यात आली आहे.