विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचे
schedule01 Jan 26 person by visibility 17 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन, प्रतिनिधी कोल्हापूर : मितभाषी, शांत व संयमी वृत्ती…मात्र लोकांच्या कामासाठी सदैव तत्पर. नागरिकांनी केव्हाही हाक द्यावी, मदतीसाठी पाऊल पुढे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे ते कट्टर समर्थक. म्हत्वाचं म्हणजे, सतत लोकांच्या संपर्कात. बोलणे कमी आणि काम जास्त ही त्यांची खासियत. यामुळे निवडणूक कोणतीही असो, सारा प्रभाग त्यांच्या पाठीमागे एकवटतो. १९९५ पासून जणू समीकरण बनले आहे, ते म्हणजे, विश्वास लोकांचा…सुभाष बुचडे हक्काचा !
माजी नगरसेवक सुभाष बुचडे हे प्रभाग क्रमांक एकमधून अनुसूचित जाती प्रभागातून काँग्रेसकडून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक सुभाष बुचडे कार्यरत आहेत. कसबा बावडा परिसरातील शुगरमिल प्रभागात गेली ३० वर्षे बुचडे कुटुंबीय प्रतिनिधीत्व करत आहे. यावरुन त्यांच्यावर लोकांचा विश्वास दिसतो. सामाजिक कार्याच्या आवडीतून सुभाष बुचडे हे समाजकारण व राजकारणाकडे आकर्षित झाले. त्यांचा राजकारणातील प्रवेश हा १९९५ मधील. आमदार पाटील यांचे ते कट्टर समर्थक. मितभाषी, शांत व संयमी वृत्ती. लोकांची कामे करण्यासाठ सदैव तत्पर. १९९५ मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर त्यांनी प्रभागात विविध विकास कामे केली.
त्यांच्या वहिणी, मनिषा लक्ष्मण बुचडे यांनी २००० ते २००५ या कालावधीत या प्रभागातून प्रतिनिधीत्व केले. मनिषा बुचडे यांनी परिवहन समिती सभापती म्हणून काम केले. ई तिकीट, अंध व्यक्तींना तिकीटात पन्नास टक्के सवलत हे निर्णय त्यांच्याच कालावधीत झाले. महापालिकेच्या २०१० मधील निवडणुकीत सुभाष बुचडे यांच्या पत्नी वंदना बुचडे या राजर्षी शाहू विद्यालय प्रभागातून जिंकल्या. पुढे वंदना बुचडे यांची महापौरपदी निवड झाली. तत्कालिन पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना महापौरपदी संधी दिली. हा दिवस बुचडे कुटुंबीयांना अविस्मरणीय. सतेज पाटील यांचा विश्वास आणि लोकांच्या सहकार्याच्या बळावरच शहराचे प्रथम नागरिक होण्याचे भाग्य लाभले अशी बुचडे कुटुंबीयांची भावना आहे. या साऱ्या कालावधीत सुभाष बुचडे हे नागरिकांसाठी काम करत राहिले. २०१५ मधील महापालिका निवडणुकीत सुभाष बुचडे रिंगणात उतरले आणि विजयाची परंपरा कायम ठेवली. नगरसेवक म्हणून काम करताना सतत प्रभागातील लोकांच्या कामाला प्राधान्य दिले. पदाची हवा कधी डोक्यात जाऊ दिली नाही. लोकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही या भावनेने ते काम करत असतात. आतापर्यंतच्या कामाच्या बळावर आणि लोकांच्या विश्वासावर ते यंदाच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.