Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विश्वास लोकांचा, सुभाष बुचडे प्रभागाच्या हक्काचेतततत ततझाडू कामगाराचा मुलगा महापालिकेच्या मैदानात, प्रभागात ठरतोय हक्काचा उमेदवारनिवडणुकीनंतर महापालिकेतील सत्तेच्या चाव्या जनसुराज्य शक्ती पक्ष - आरपीआयकडे असतील : समित कदमशिक्षकांच्या पगाराला विलंब, प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचा आंदोलनाचा इशारामहापालिका शिवसेना निवडणूक समन्वयकपदी रत्नेश शिरोळकरशहीद महाविद्यालयात ग्लोबल कोल्हापुरी संवाद : अमेरिकेत कार्यरत युवा आयटी तंत्रज्ञांची अनोखी मैफलजिल्हा परिषदेची निवडणूक दोन दिवसात जाहीर ?चांगभलं…जनसुराज्य लढविणार २९ जागा  ! अक्षय जरग, प्रसाद चव्हाण, सुभाष रामुगडेंची बंडखोरी! !उमा बनछोंडेनी दाखल केला उमेदवारी अर्ज

जाहिरात

 

झाडू कामगाराचा मुलगा महापालिकेच्या मैदानात, प्रभागात ठरतोय हक्काचा उमेदवार

schedule01 Jan 26 person by visibility 20 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वडील महापालिकेत झाडू कामगार, मुकादम म्हणून नोकरीला. मुलाला सामाजिक कार्याची आवड. तरुण वयातच भागातील सार्वजनिक कार्यक्रमात आघाडीवर राहून काम करण्याची सवय. नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीला तत्परयामुळे भागातील मतदारांचा विश्वास वाढत गेलानागरिकांचा वाढता प्रतिसाद, मतदारांचा विश्वास आणि नेतेमंडळीचे आशीर्वाद या बळावर झाडू कामगाराचा मुलगा महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून अनुसूचित जाती प्रवर्ग गटातून वैभव दिलीप माने हे शिवसेनेकडून लढत आहेत. माने यांनी यापूर्वी कोल्हापूर उत्तर संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून प्रभावी काम केले. या योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला.

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष एकत्र असून महायुती म्हणून निवडणूक लढवित आहेत. यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढवित असलेले उमेदवार वैभव माने हे गेली २५ वर्षे कार्यकर्ता म्हणून भागात सक्रिय आहेत. २००० च्या आसपास महाडिक कुटुंबीयांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कामाला सुरुवात झाली. भागातील कोणतीही समस्या असोत, नागरिकांच्या अडचणी असोत त्याची सोडवणूक करत भागाचा विश्वास संपादन केला. माजी महापौर सुनील कदम, महापालिकेतील ताराराणी आघाडीचे तत्कालिन गटनेते व सध्या शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. भागात केलेल्या कामाची दखल घेत २०१५ मधील महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून त्यांच्या पत्नी कविता वैभव माने या विजयी झाल्या.

नगरसेविका माने यांच्या पाच वर्षे नगरसेवक म्हणून प्रभागाच्या विकासाला प्राधान्य दिले. पाच वर्षाच्या कालावधीत प्रभागात पायाभूत सुविधांची उपलब्धता केली. रस्ते, गटर्सची सुविधा केली. प्रभागात मुबलक व सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध केला.प्रभागातील रस्ते चकाचक केले. नगरसेवकांकडून लोकांच्या ज्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यावर भर दिला. या साऱ्या कामात वैभव माने आघाडीवर होते. भागातील नागरिकांसाठ मेडिकल कॅम्प आयोजित केले. वैद्यकीय सुविधा मिळवून दिल्या. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना १८०० लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिला. गेली पाच वर्षे महापालिका सभागृह नव्हते. मात्र माने यांनी एक कर्तव्य म्हणून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी काम केले. महापालिकेशी निगडीत कामांची सोडवणूक केली. प्रशासनाकडे पाठपुरावा करुन प्रश्ने मार्गी लावली. या कामाच्या बळावर आता नगरसेवकपदाची निवडणूक लढवित आहे. महायुतीच्या नेतेमंडळीच्या माध्यमातून प्रभागाचा विकास साधायचा यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes