महापालिकेत आयुक्तपदी महिला, पण शहरात महिलांच्यासाठी स्वच्छतागृहांची वाणवा
schedule18 Jul 25 person by visibility 82 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर महापालिकेत अनेकदा महिला आयुक्त कार्यरत होत्या. आता ही महापालिकेच्या आयुक्तपदी महिला अधिकारीच आहेत. तरी कोल्हापुरात महिलांच्यासाठी सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. येत्या नवरात्रोत्सवापर्यंत महिलांच्यासाठी स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध केली नाही तर महापालिका अधिकाऱ्यांना घेराव घेतला जाईल असा इशारा माजी नगरसेविका भारती पोवार, व काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. महापालिकेत सत्ता काँग्रेसची असो वा अन्य कोणाची महिलांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे. गेल्या दहा वर्षात महापौरपदी ही अनेक महिला विराजमान झाल्या, मात्र स्वच्छतागृहांची सोय होऊ शकली नाही ही लाजिरवाणी बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये प्रशासनाची मोठी जबाबदारी असते. स्वच्छतागृहांच्या सुविधेसंदर्भात महापालिकेकडे इको फ्रेंडली स्वच्छतागृहांचा प्रस्ताव सादर केला. मात्र महापालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. कोल्हापूरचे उद्योजक सुनील बोडके यांनी स्वयंचलित इको फ्रेंडली स्वच्छतागृहांची संकल्पना तयार केली आहे. त्यांनी यासंदर्भात महापालिकेकडे प्रस्ताव दिला परवानगी द्या देखभालीचा खर्च मी सांभाळतो अशी त्यांनी तयारी दर्शविली. तरीही प्रशासनाने तो प्रस्ताव नाकारला. महापालिका अधिकाऱ्यांनी स्वच्छतागृहासंबंधी संवेदनशीलता दाखवून येत्या नवरात्रोत्सवापर्यंत सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
थेट पाईपलाईन योजना अंतर्गत शहरातील पाणीपुरवठावरून आमदार सतेज पाटील यांच्यावर होणारी टीका निरर्थक आहे. आमदार पाटील यांनी भगीरथ प्रयत्न करून कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. योजनेअंतर्गत पुईखडीपर्यंत पाणी आणणे ही जबाबदारी सतेज पाटील यांच्याकडे होती. शहरांतर्गत सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. महापालिकेच्या चुकीच्या कामकाजामुळे शहरातील अनेक भागांना पाणीपुरवठा नीटपणे होत नाही त्याचा दोष काही जण सतेज पाटील यांना देतात ते चुकीचे आहे. आमदार पाटील यांच्यामुळेच थेट पाईपलाईन योजना अमलात आली, त्याचे फुकटचे श्रेय कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. काही मंडळी म्हणतात की, आम्ही विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून आंदोलन केले म्हणून थेट पाईपलाईन योजना आली. मात्र या योजनेचे खरे श्रेय पाटील यांनाच आहे असेही माजी नगरसेविका पोवार यांनी सांगितले. कोल्हापूर शहराला मंजूर झालेला 108 रुपये कोटीचा निधी संदर्भात नागरिकांना सविस्तर माहिती द्यावी. तो निधी कधी आला, किती वापरला गेला आणि उर्वरित निधी कुठे आहे या संदर्भात खुलासा करावा. शहरातील रस्त्यांची अवस्था आजही बिकट आहे.या निधीच्या वापराबद्दलची वस्तुस्थिती नागरिकांना समजली पाहिजे अशी आमची भूमिका आहे.
पत्रकार परिषदेला संपतराव चव्हाण पाटील, किशोर खानविलकर, संध्या घोटणे, वनिता देठे, उज्वला चौगुले, अलका सनगर, मंगल खुडे, वैशाली महाडिक, पूजा आरडे, वैशाली जाधव आदी उपस्थित होते.